सन्मान कुणाचा
सन्मान कुणाचा
1 min
220
करू सन्मान त्या वीरांचा
करती सेवेला देशसीमेवर
जगावर कोसळलेल्या या
आपत्तीला थोपवुन तोवर
स्वप्राणांची चिंता नसता
रोग्यांची ते काळजी घेती
संसर्गजन्य रोग सामोरी
औषधपाणी त्यांना देती
बॅंक, ड्रायव्हर,कचरावाले
पुरवी अत्यावश्यक सेवा
आहे त्यांनाही घरसंसार
तुम्हा देती सत्कार्याचा मेवा
भाज्या फळे किराणा दूध
मिळते रोज तुम्हां घरात
घरपोच आणती सिलींडर
नकोच तुमची बाहेर वरात
करा सन्मान सत्कार तुम्हीं
अशा थोर महान व्यक्तींचा
आठवण ठेवा संकटकाळी
हात असू द्या सदा मदतीचा
