संक्रात
संक्रात
तीळ पांढरा,
गूळ तांबडा,
मिळवा थोडा थोडा.
तीळ गूळ घ्या
सूर्य देवता.
प्रकाशाचे,
वाण द्या.
उत्तरायण सुरु झाले,
तीळ गूळ घ्या,
सूर्यदेवता.
प्रकाशाचे वाण द्या.
प्रकाश सारा,
भुईवर,
कोवळे किरण
तुम्ही द्या,
तीळ गूळ घ्या,
सूर्यदेवता.
प्रकाशाचे वाण द्या.
तीळ बारीक,
स्वाद मोठा,
तीळ तीळ,
प्रेम द्या
प्रेम घ्या.
तीळ गूळ द्या,
मज माता पिता.
आशीर्वादाचे वाण द्या.
सखे सोयरे,
मित्र बंधू,
तिळाएवढे प्रेम द्या,
गुळावाणी गोड व्हा.
तीळ गूळ द्या
एकमेका.
प्रेमाचे वाण द्या.
तीळ बारीक,
गूळ घाला
थोडा थोडा,
गोड पणाचे,
वाण द्या,
तिळासारखे
लहान व्हा.
तिळगुळ घ्या,
गोड बोला,
क्षण मिळाला,
संधी घ्या,
मंद प्रकाश,
झाला आता,
क्षतिजावर,
सूर्य आला,
संक्रात ओसरेल
आता,
तीळ गुळाचे,
वाण द्या.
