STORYMIRROR

Savita Jadhav

Others

3  

Savita Jadhav

Others

संकल्पना प्रेमाची

संकल्पना प्रेमाची

1 min
234

प्रेम ही संकल्पना फार मोठी

प्रेम ही भावना फार मोठी

प्रेम असते निःस्वार्थी,निरपेक्ष

ते न होते कुणाच्या अपरोक्ष

🌷🌷

प्रेमामध्ये काही न बोलता

खूप काही समजून येते

त्या समजण्यातही,

एक निःशब्द शांतता असते

🌷🌷

असे म्हणतात,

प्रेम आंधळे असते

त्याकडे डोळसपणे पहावे

खऱ्या प्रेमामध्ये,

कोणतेही तर्कवितर्क नसावे

🌷🌷

प्रेमात ही आपली कर्तव्ये असती

कर्तव्य तेव्हा अडथळे वाटती

तरीही आपण कर्तव्य करावे

प्रेम त्यागूनी हसत जगावे

🌷🌷

कारण,

त्याग हेच प्रेमाचे दुसरे नाव

त्यात नसावा कशाला ठाव

🌷🌷

प्रेमात नसावी वासना

प्रेमात नसावा मी पणा

हीच खरी प्रेमाची महती

यालाच तर खरे प्रेम म्हणती

🌹🌹🌹🌹🌹🌹

      

           


Rate this content
Log in