संकल्प नववर्षाचा
संकल्प नववर्षाचा
1 min
299
गतवर्षीची संध्याकाळ
संकल्पाने झाली तयार
आशेचे पंख घेऊनी
पूर्णत्वाला होते सवार
चाळलेले गेल्यावर्षी
अनुभव अस्सल घेतले
वाईट अनुभवाचेे मात्र
निवडायचे ठरविले
सैल पीळ नात्यांचा
प्रेमाने आवळायचा
आपुलकीच्या धाग्यांनी
गोफ दुहेरी विणायचा
दिवस-रात्रीच्या चक्राचे
प्रहर मोजत बसतो
हातातल्या क्षणाचे
मोलच विसरून जातो
संग्रह या क्षणांचा
या साली करायचा
निसटण्याआधीच तो
ओंजळीत साठवायचा
भुतकाळाची पुंंजी
भविष्य घडवते
वर्तमान नववर्षा
तुझे स्वागत करते
