संगीत
संगीत
1 min
350
संगीताच्या कोलाहलात आज ते
सूर हरवले न जाणे कुठे
कर्णबधिर वाद्यांच्या गर्दीत
स्वरभानच ते अलगद सुटे
शब्दसुरांच्या मैत्रीचे ते
अवशेष दिसती क्वचित कुठे
शब्द गेले सूरही विरले
संगती स्वरांची भेट तुटे
संगीत आराधना स्वरांची
प्रसन्न होतील खचित ते
सरस्वती मग प्रसन्न होईल
सामोरी येईल स्वरातून ते
कलारत्न संगीत तू ते
वदती सारे या क्षेत्रा
जपू या निगुतीने अभिजात संगीता
जतन करू या वारसा मित्रा
