संघर्ष
संघर्ष


घडलो होतो बालपणात,
संस्काराच्या सानिध्यात,
सुख असायचं अज्ञानात,
उनाड मन आनंदात.
झिजलो होतो आयुष्यात,
संघर्ष होता नसानसात.
हक्कासाठी लढताना,
अन्यायावर केली मात.
लढलो होतो जीवनात,
सामर्थ्य होते बाहुबलात,
आव्हानांना भिडतांना,
वादळांनाही केलं बेचिराख.
शिक्षणाचा धरून ध्यास.
राबलो होतो उन्हा-तान्हात,
अंधारात पैशासाठी नाही,
पसरले कोणापुढ हात.
राबलो होतो कारखान्यात,
यंत्राच्या आवाजात.
भांडवलशाहीला भिडतांना,
परिस्थिती वर केली मात.
चढलो होतो डोंगर सुखदुःखांचा,
सहानुभूतीन नटलेला.
उरात होतं वार ध्येयाच,
स्वाभिमानाने चलताना.
लढलो आहे प्राणपणाने,
कवेत अंबर घेताना.
जिंकलो आहे साऱ्या पैजा,
आयुष्याला भिडतांना.