STORYMIRROR

SHUBHAM KESARKAR

Others

4  

SHUBHAM KESARKAR

Others

संघर्ष

संघर्ष

1 min
352

कोवळ्या ह्या मुठीत जपले

लहानपणीचे स्वप्न सारे

तारुण्यात कधी एकदा 

स्वप्नात डोकावून पाहणे ।।धृ।।


जन्म नवे, कार्य नवे

रंगमंचास आपले मानले

स्वप्न बाळगुनी मनात सारे

गुंफूगुंफूनी ही माळ बने ।।१।।


विविध ह्या कलाकृतींचे

दर्शन एकोप्यात घडले

रंगमंच ह्या जीवनावरती

कसे निदर्शनास आणले ।।२।।


होतो बाळगूनी स्वप्न सारे

तनमनात हे संचारले

न बघावे मागे वळूनी आता

पूर्ण प्रत्येकास करणे ।।३।।


होते हाती सर्व काही

परंतु अडचणींवर सर्व थांबले

एका क्षणात मज वाटे आता 

की सर्व काही संपले ।।४।।


पण हरण्याची इच्छा नव्हती 

नव्हती इच्छा ही शरणागतीची

पुढे येऊन मागे जाण्याची

नव्हती वेळ ही त्या काळाची ।।५।।


काळ हा पुरताच जणू 

जीवन बदलूनी गेला

वयाच्या प्रत्येक क्षणी

कष्टाचे धडे शिकवीत आला ।।६।। 


अखेर सारे सुफळ संपूर्ण झाले

होते नव्हे ते सर्व काही मिळाले

विश्वासावर उभारलेल्या ह्या स्वप्नात मी

माझे अस्तित्व निर्माण केले ।।७।।


Rate this content
Log in