संघर्ष
संघर्ष
संघर्षाला खरचं नाही
जीवनात कसलीही तोड
संघर्षातून मिळालेली अर्धी
भाकरीही लागते खूप गोड.....
संघर्षाला हवी आहे
माणसा मेहनतीचा जोड
फळ मिळाले नाही
म्हणून निराश होणे सोड.......
तूटणे आणि मोडणे
हेच आहे संसाराचे खेळ
परत जोमाने उभा राहण्यास
स्वतःच दे स्वतःला वेळ.......
संघर्षा विना होतं नाही
कधीच स्वप्न पूर्ति
आठवावे दिले प्राण देशासाठी
त्या महान हुतात्म्यांचे स्म्रुती......
जात नाही वाया कधीच
माणसा मेहनतीचा फळ
संघर्षानेच जीवनात मिळते
पुन्हा जगण्याचे बळ.......
हरता हरताच शिकता येते
जिंकण्याचे खरे धडे
ज्यांनी केले संघर्ष आयुष्यात
त्यांचेच नवीन इतिहास घडे.......
