संदर्भ
संदर्भ
1 min
174
ना पर्वा
ना तमा
चढली धुंदी
नाही नाती
नाही घर
हरवले संदर्भ
रूसल्या बागा
उठले शहारे
झपाटली झाडं
झपाटली जंगल
पोटातली मळमळ
पानांत सळसळली न्
रंगीत पाखरांना
चाहूल लागली
गडद काळ्या ढगाची
आणि त्याच काळ्या ढगातून
अचानक आक्रमणं सुरू झाली
मग काय ........
मनातले ते संदर्भ शोधू लागलो
त्याच काळवंडलेल्या वातावरणात
