STORYMIRROR

Deepa Vankudre

Others

4  

Deepa Vankudre

Others

संध्याराणी

संध्याराणी

1 min
249

रम्य सांजवेळी, पक्षी, घरट्यात परतले,

वाट पाही नेत्र ज्याची, वाजे न त्याची पावले!


घाली पिंगा वा-यावर, मेघ केशरी गगनी,

दूर प्रवासी, न येई कळ काहूरल्या मनी!


पापणीच्या काठातून, अश्रू वर्षा बरसते,

चिंब झाल्या नदीकाठी, रव पाकोळी करते!


ऐकू न येते तरी भिडते, अंतरात साद तुझी,

आर्त हाक देशी तू की, प्रीत खुळी म्हणावी माझी!


निशा सांगे, संध्याराणी, माझा निरोप देशील?

शुक्रतारा उगवला, चंद्रा, माघारी येशील?


Rate this content
Log in