STORYMIRROR

Prashant Shinde

Others

4  

Prashant Shinde

Others

संध्याकाळ....!

संध्याकाळ....!

1 min
678

टेरेसवरची संध्याकाळ

पश्चिमेला मला खेचत होती

कसब आपले निसर्गातले

हरतऱ्हेचे दाखवत होती


फुटल्या दुधाची तांबूस साय

पश्चिम क्षितिजातून फेकत होती

पूर्वेपर्यंत ती लिलया

स्ववेगे स्वतेजासह पसरत होती


गर्द सावली छटा अशी

अडसर झाडांना लाभत होती

वेगळीच किमया आज मला

निसर्गाची पाहायला मिळत होती


अस्तास चालल्या रविराजाचे

दुःख विखुरले असावे मज वाटले

विरहात त्याच्या मन माझे

डोळा पाणी आणून द्रवले


आतुर होतो मी अाभा पाहण्या

त्या रविराजाची सायंकाळची

तो हिरमुसला होता वाटले

वेळ होता परत घरी जाण्याची 


मी समजावले तयाला

ये उद्या पुन्हा रे खेळायला

पहाटे पहाटे खेळ मांडू आपण

नववर्षाची सुरुवात करण्याला


तो हसला बुडता बुडता

निरोप माझा घेताना

खरेच जड झाले मन माझे

निरोप आज त्याला देताना....!


Rate this content
Log in