संध्याछाया
संध्याछाया
1 min
257
सुगंध घेऊन क्षितिजावरती
आली बरसत माया
रवीकिरणांच्या सोबत आली
तांबूस संध्याछाया
आठवणींचे ओले ढग
ओतू लागली प्याया
क्षणा क्षणांची भिजली पाने
सरीत चिंब ही काया
त्याचं धरेवर अंथरलेली
एक सावळी छाया
संध्या छाया म्हणू तिला की
एक असुरी माया
दर्पणास ही भिती वाटते
नटली सांज पहाया
संध्या छायेमध्ये पुन्हा
झगमगली बघ काया
कातरवेळी नको याद ती
दुःख हवे विसराया
पुन्हा नव्याने रुजेल अश्रू
गीत उद्याचे गाया
हसे नेत्र नि हसे ओठ
अंधारी बिलगता राया
किती पाखरे कवटाळूनीया
रडली संध्याछाया
