संधीसाधू...
संधीसाधू...
1 min
559
कित्येक लोक मानतात काही ढोंगी बाबा ना
पुजतात दररोज त्यांच्या फोटोला
गुणगान चालू असतं त्याचं नामजपही चालू असतात
बाबाही आपल्या चमत्काराची प्रसिद्धी करत असतात
आजच्या कोरोनाच्या लढाईत नाही कुठला चमत्कार दिसला
नाही कुठले ढोंगी बाबा समोर आले
न कुठला चमत्कार केला
खरे उतरले आपल्या रक्षणासाठी ते आपले पोलिस आणी डॉक्टर आणी सहकारी
खरे पुजन तर त्यांचे करायला हवे जे देवरुपात आपल्यासाठी लढत आहेत वेळोवेळी
