संचारबंदी
संचारबंदी
१५ मार्च २०२० पासून
कोरोनाने कहर केलाय
जगात धुमाकूळ घातला
प्रेतांचा हो ढीग पडलाय...
जगा सावरण्या शासनाने
सर्व ठिकाणी लाॅकडाऊन केले
मुलाबाळांसमवेत सारेजण
आपल्याच घरात बसले.....
आपल्या कुटुंबाला दिला वेळ
घाई नाही जाण्याची कामाला
वडीलांसमवेत मुलेही राहिली घरी
आनंद मिळाला सार्याच कुटुंबाला...
घरातील स्त्रीने नवेनवे पदार्थ शोधले
नेटवरून छान छान पदार्थ बनवले
खायला घातले सर्व घरादाराला
तृप्तीने सर्वांनी मायेने आशिष दिले...
जरा मधे कोरोना शांत झाला होता
सर्व सुरळीत चाललेय असे वाटले
पण हाय! काही दिवसात परत झाले
लाॅकडाऊन
लोकांनी परत घरातच बस्तान बसवले...
शासनाने केलीय संचारबंदी आता
माणसाची झालीय जमावबंदी
बाहेर जायचे, यायचे नाही सध्या
घरात बसूनच पाळायची संचारबंदी...
