समुद्र
समुद्र
1 min
529
ओढे, नाले वाहती
नदीला मिळुनी नदीचा
घेर मोठावला
तो वाहात
दगडांच्या खाडीतून
डोंगरातून जमिनीकडे
पडताना 'धबधबा'
होऊन पाण्याचे फवारे
वाऱ्याने भिरकावले
पाण्याच्या थेंबाने
अंगावर येताच
मन ओंथबले
हर्षोल्हसित झाले
मन स्फुरण पावले
नदी वाहात पुढे समुद्राच्या कुशीत झेपावली
तिथे गोड पाणी, खारे पाणी, पाणभिंत झाली.
तिथेच, नदीचा, समुद्राचा संगम झाला
अथांग समुद्र झाला...
