STORYMIRROR

Hemant Patil

Others

1  

Hemant Patil

Others

समुद्र

समुद्र

1 min
207

ओढे, नाले वाहती

नदीला मिळुनी

नदीचा घेर मोठावला

तो वहात दगडांच्या

खाडीतून, डोंगरातून

जमिनीकडे पडताना

"धबधबा" होवूनी

पाण्याचे फवारे

वाऱ्याने भिरकावले.

पाण्याच्या थेंबाने

अंगावर येताच

मन ओथंबले

 हर्षे प्रफुल्लित झाले

मन स्फुरण पावले

नदी वाहत पूढे समुद्राच्या

कुशीत झेपावली...

तिथे गोड पाणी

खारे पाणी पाणभिंत झाली.

तिथेच,नदीचा समुद्राचा

संगम झाला अथांग समुद्र झाला.


Rate this content
Log in