STORYMIRROR

Pratibha Bilgi

Others

3  

Pratibha Bilgi

Others

समुद्र किनारी

समुद्र किनारी

1 min
363


समुद्राच्या किनारी खेळ लाटांचा 

त्यांच्याशी नाही मेळ कोणाचा 


‌शंख शिंपल्यांचा ढिग पसरला 

‌वाळूचा सुद्धा गालीचा अंथरला 


रांगेत उभी झाडे नारळाची 

वेगळीच छाप सोडे मनाशी 


‌निळयाशार पाण्यावर नाव होडी तरंगी

‌चाललेय स्पर्धा लाटांशी या सर्वांची


मासे पकडण्यात गुंग कोळी 

भरते नेहमीच त्याची रिकामी झोळी 


‌सूर्यास्त समयी रंग अनोखे उधळती

‌एकमेकांत सुंदर रितीने कसे मिसळती 


पक्षांची लगबग घराकडे परतायची 

आभाळही जणू त्यांचा पाठलाग करती 


कधी शांत कधी दर्या उफाळणारा 

हजारो जीवांना हृदयात सामावून घेणारा


ह्याच्यापाशी आहे वेगळाच जिव्हाळा 

खारट पानी तरी अंदाज निराळा


Rate this content
Log in