Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vimal Patkari

Others

4.5  

Vimal Patkari

Others

समतोल पर्यावरणाचा !!

समतोल पर्यावरणाचा !!

1 min
210


झाड लावू या झाडं लावू या

पर्यावरणाचा समतोल राखू या !

'एक मूल एक झाड'उपक्रम राबवू या

जीवनासाठी या वसुंधरेला वाचवू या !!

वृक्ष अन वल्लरी सोयरे सोबती

हृदयाशी जोडू या मुळांची ही नाती 

जगवू या झाडांना देवुनी खतपाणी 

जगण्यासाठी श्वास अन्नाचा घास

वनस्पती देती वस्रांची ही साथ !!

जंगलतोड करुनी नका उभवू या भिंती

साऱ्यांचे हे जीवन आहे बहू किमती 

वृक्ष रोपणाची आता वाढवू या गती

ढग अडवुनी गार गार वारा देवुनी 

तरु आणतील अवनीवरी पर्जन्यसरी!!

पर्यावरणाची रुपे सूर्यशक्ती-भू-हवा-पाणी 

वातावरणाचे राखी संतुलन वनराई 

सामाजीक वनीकरणातून घडवू हरितक्रांती

कस वाढवू जमिनीची धूप थांबवू 

वसुधेचं हे जीवन वनश्रीने उंचवू !!

निसर्ग प्रेरक या मानवी प्रगतीस

कर्तव्य मानवाचे जोपासणे सृष्टीस

चला ठेवू जपुनी नैसर्गिक संपत्तीस 

जगण्याची धरु आस राखू स्वस्थ पर्यावरणास

वृक्षारोपण अन संवर्धन नेवू पूर्णत्वास!


Rate this content
Log in