STORYMIRROR

Manisha Potdar

Others

3  

Manisha Potdar

Others

समस्येचं हल

समस्येचं हल

1 min
138

निसर्गाचा चालूच राहणार खेळ

माणसालाच घालावा लागणार मेळ

दुष्काळ म्हणजे निसर्गाचा दुष्ट काळ

निसर्गाशीच जोडली सुखाची नाळ

जाणार दुष्काळ येणार सुकाळ

निसर्गाची आपण वाजवणार टाळ


निसर्गचक्राची चालूच राहणार चाल

माणसा जवळ बुध्दी आहे चंचल

पाहीजे तिथे नेऊ शकतो जलजल

कधी निसर्ग तापेल कधी बरसेल

मानवाची लगेच होते घालमेल

सरकारी मदतीची होते रेलचेल


देश,राज्य, शहर,मदतीला येतील

माणसाजवळ आहे समस्येचे हल

आंदोलन, मोर्चे,कर्जमाफी मागतील

प्राणी,पक्षींना मदतीला कोण बरे येईल

निसर्गचक्र करत सुटतं धुमाकूळ

प्रत्येक प्राणी पक्षांना लागते झळ

दिसत नाही कुणाला त्यांची तळमळ

घरटे बांधतांना चालते त्यांची चळवळ


निसर्गाशी नातं त्यांचं पक्क निर्मळ

दुष्काळ समस्ये पासूण काढत नाही पळ

अन्न,पाणी,निवाऱ्यासाठी वाढवतात बळ

निसर्गाशी तडजोड करुण घालता मेळ



Rate this content
Log in