सम्राट अशोक ( अभंग रचना )
सम्राट अशोक ( अभंग रचना )
1 min
751
( अभंग रचना )
लाभला विराट | सम्राट अशोक I
भारतास एक | चक्रवर्ती ॥ १ ॥
कलिंग जिंकला | मनाने हारला I
भिक्खूंनी तारला | धम्मपदे ॥ २ ॥
विजया दशमी | मार्ग अहिंसेचा I
तो बुध्द धम्माचा | दिक्षा घेता ॥ ३ ॥
धम्माचा प्रसार | पाठवी भिक्खूंना I
ती धम्मदेसना | जगतात ॥ ४ ॥
स्तुपांची निर्मिती | शिलालेख किती l
सांगती महती | बुध्दांचीच ॥ ५ ॥