समजून सारं...
समजून सारं...
समजून सारं घेतल की..
समोरचा ही बरोबर वाटतो
न पटणारा त्याचा विचार ही
मनाला खरोखर पटतो
समजून सार घेतलं की..
कळतं जीवनाच तत्वज्ञान
प्रेम,आपुलकी,नात्याविना
जीवन व्यर्थ हेच आहे जगण्यातील सार
समजून सार वागल की..
काही चुकत नाही
विरत जाणाऱ्या नात्यांना
मग कोणीच मुकत नाही
समजून सारं घेतलं की..
सकारात्मकता येते मनी
भिजलेल्या पापण्यांची दुःख सारी
वेचता येतात जुळतात ऋणानुबंध जन्मांतरी
समजून सारं ,उमजून घेतलं की
गैरसमजाचे धागे गुंतत नाहीत
हळुवारपणे जपलं की एकमेकांचे
हेवेदावे खोलवर रुतत नाहीत
समजून सारं जाणल की..
मनसोक्त व्यक्त होता येतं
प्रत्येक गोष्टीवर तोडगा निघतो
उत्तर न सापडणारा प्रश्नही क्षणात मग सुटतो.
