समजून घ्यायला हवे
समजून घ्यायला हवे
आयुष्य खडतर आहे,
खाच खळगे, अडचणी येणारच
क्षण सुखाचे उपभोगत असता
दुःख धक्के देणारच
समजून घ्यायला हवे
त्याने दुःख त्रास देत नाही
उपेक्षेचा त्रास भारी
मी केल्याचा गर्व भारी
अपेक्षाभंगाची सल न्यारी
तिथेच तर गोम आहे सारी
समजून घ्यायला हवे
निरपेक्ष जगायला हवे
आई, वडील कष्ट करतात
मुलांना शिकवून मोठे करतात
मुलांनी समजून घ्यायला हवे
चांगले संस्कार व्हायलाच हवे
चूक! अपराध!
मग तो कुणाचाही असो
काहीतरी कारण असतेच
जाणून बुजून घडत नाही
काहीतरी असतो पेच
जुन्यातल्या चांगल्या बरोबर
नव्या चांगल्या मार्गाचा स्वीकार
कालबाह्य रुढींचा धिक्कार
समजून घ्यायला हवे
दुसऱ्या बरोबर स्वतःलाही
स्वतःच्या स्वत्वाला
आणि सत्वाला
समजून घ्यायला हवे
समजून घ्यायला हवे
