STORYMIRROR

Nita Meshram

Others

3  

Nita Meshram

Others

स्मितहास्य

स्मितहास्य

1 min
267

स्मितहास्य तुला देवाने दिधले

का मानवा लढतोस असा

गीत सृजन प्रेमाचे गाऊन

जगण्याचा घे मंत्र नवा

नको कधी छळू कुणाला

नको कधीही कपट करू

जाण एकदा ऐकून घे

इतरांनाही मित्र बनून

दुःख मानवा अनंत अगाध

दुःखाचे कारण तृष्णा

सांगे तुला हा बुध्द नित्य

स्मितचर्येने बघ कसा

दुःख दुर करी स्मितहास्य

जगास देई आनंद

विजय मिळविला दुःखावर

तर जगणे आपल्या हातात

हास्यात तुझ्या या दडले दुवे

प्रेम, शांती अन् करूणेचे

मानवाच्या कल्याणाचे

मानवाच्या समृद्धीचे


Rate this content
Log in