STORYMIRROR

Sarita Sawant Bhosale

Others

3  

Sarita Sawant Bhosale

Others

समानतेच जग तिलाही जगू द्या

समानतेच जग तिलाही जगू द्या

1 min
330

ती देवी आहे, ती दुर्गा आहे असं म्हणत तिला मंदिरात पुजू नका

तुमच्या घरात माणूस म्हणून तिलाही सन्मान द्या

समानतेचं जग तिलाही जगू द्या

ती आहे एक आई, सून, बायको

असं म्हणत त्यागाची मूर्ती तिला बनवू नका

कर्तव्याच्या दोरीला न बांधता

तिला तिचं कर्तृत्वही गाजवू द्या

समानतेचं जग तिलाही जगू द्या

ती विश्वाची जननी, ती धीराची स्वामिनी

उदरी जिच्या जन्म घेतला तिचं अस्तित्व नाकारू नका

हात हातात तिचा घेऊनी अस्मितेचा

आदर होऊ द्या समानतेचं जग तिलाही जगू द्या


साहित्याला गुण द्या
लॉग इन