STORYMIRROR

pooja thube

Others

3  

pooja thube

Others

समानता

समानता

1 min
428

आहेत अनेक विषय

घातला गेला ज्यांना हात

तरीही नाही सुटले

नाही देऊ शकलो मात


प्रश्न आहे समाजापुढे

स्त्री पुरुष समानतेचा

प्रश्न आहे हा 

गहन भेदभावाचा


खांद्याला खांदा लावून

काम करते स्त्री

जिद्द नाही सोडत

थकली जरी ती


परीक्षांमध्ये आजकाल

मुलीच चमकतात 

नोकरीही हिमतीने

त्या मिळवतात


आज सगळ्या क्षेत्रात

आहेत महिला

आरक्षणाच्या कुबड्या नकोत

स्वातंत्र्य द्या त्यांना 


वरवर असते स्वातंत्र्य

गोडवे गातात फार 

खरतर तोंड दाबून 

असतो बुक्क्यांचा मार


महिला सबलीकरणाचे 

स्तोम माजवता 

स्त्री पुढे आली पाहिजे

यावर तर भाषणे गाजवतात


कृतीशून्य सारे

असे नाही चालणार 

स्वतःच्या आयुष्याची दोरी

स्वतः स्त्रीच सांभाळणार  


नाही फार दूर तो दिन

जेव्हा महिला सबलीकरण 

ही संज्ञाच 

जाईल पुसून 


कमी नका समजू

स्त्री आहे ही

स्वप्ने नव्या जगाची

ही पाही  


Rate this content
Log in