समाजात वावरताना
समाजात वावरताना
1 min
210
पर्वा ना या जगी प्रामाणिकतेची..
प्रामाणिकतेलाही गरज आहे प्रमाणाची..
खरं बोललं तर लोक दुरावतात..
खोटं बोलेल त्याला जवळ करतात..
साधं सरळ जीवन जगणारे नेहमीच फसतात..
चोर लुटेरे मात्र नेहमीच हसतात...
चांगल्या व्यक्तीला सदैव बोलणे ऐकावे लागते..
कपटी वाईट प्रवृत्तींना मात्र नेहमी सहानुभूती मिळते..
साध्या सरळ व्यक्तीचे जीवन जगणे कठीण झाले आहे ..
दृष्ट प्रवृत्तींना मात्र थाटात जगण्याची मुभा आहे..
काय करावे, कसे जगावे कळत नाही काही..
प्रामाणिक सरळ जगणाऱ्याला जगी किंमत नाही..
