समाजाची विचारसरणी...
समाजाची विचारसरणी...
1 min
248
काहि ठिकाणी का
महत्वाच्या फक्तच जाती
जळण्याआधीच का तुम्ही
विझवल्या काहि वाती ???
ईतके वर्ष का नाहि
घालवता आला वर्णभेद
यास कधी देणार आधुनिक
विचारसरणीचा छेद ???
माणसांना पैसा बंगला
पाहुन का तोललं जात
मग सामान्यांना टाकुन
दिल्यागत का बोललं जात ???
मानवी मुल्यवर्धनाची तर
नाहिच होतं कुठेहि गोष्ट
आता तर भविष्यातील
समाजाचे चित्र झालाय अस्पष्ट ???
