समाज
समाज
1 min
241
नको समाजविघातक घटना
कुविचारांची करू या होळी
देऊ या सजा या कुप्रवृत्तींना
भाजून खाती आपली पोळी
विज्ञानयुगातील नव तंत्रज्ञान
ठक नि बुवा घेतात फायदा
फसवुनी जनतेला नागविती
पोलीस शिकवतील कायदा
नकोच विचार समाजाचाही
जगूयात मनाप्रमाणे जीवन
भलेबुरे समजूनीच मनासम
पाजावे स्वतःलाच संजीवन
टीकाटिपणी करणारे लोक
ठरताती अडथळे जीवनात
ऐकावे जनाचे करावे मनाचे
घालवू या वेळ प्रभूचिंतनात
वाढल्यात कुप्रवृत्ती लोकांत
असती शिते तर जमती भुते
गरीबाचे जीवन कवडीमोल
मनोवृत्तीचे दर्शन झाले कोते
