समाज
समाज
1 min
218
धर्माच्या नावावर, आम्ही पेटून उठतो.
तू आमका फलाना बिस्ताना, रेटून बोलतो.
भडकवनाऱ्याचाच, आम्ही जय जयकार करतो.
कमाल की काय, शांतीदूतालाच आम्ही शांत करतो.
दाटून येताच नैसर्गिक आपत्ती, अचानक आम्हाला जाग येते.
कोण येनार नाही वाचवायला, मनातून माणुसकीची साद येते.
पर्याय नसतो तेव्हाच, आम्ही एकत्र येतो.
परका कधीही येऊन, आमची माथी भडकवतो.
समाजाचा भाग असून, समाजाच आम्हाला वाळीत टाकतो.
स्वतः एक समाज असून, समाजालाच पाण्यात पाहतो.
