समाज ©®
समाज ©®
1 min
157
राजकारणापासून समाज कारणा
पर्यंत लागतो इथे अर्थ,
म्हणूनच परमार्थही शोधतो
आपण स्वार्थ !
दाम करतो इथे काम,
त्यास नाही कुणाचाच लगाम!
वर असणारा आणखी
वर पर्यंत पोहोचतो,
त्यावेळी खालचा मात्र
तिथेच आणखी खोल खोल
जातो कारण,
कारण ....
पुढे जाणाऱ्यांचे पाय मागे ओढण्याचे खेकड्यांचे तत्व,
प्रत्येकजण चांगलेच जाणतो!
प्रत्येकजण चांगलेच जाणतो!!!....
