STORYMIRROR

Varsha Pannase

Others

2  

Varsha Pannase

Others

समाधी अभंग

समाधी अभंग

1 min
110

बाळूमामाच्या नावानं चांगभलं

हे पंढरीनाथा विठ्ठला माय रुक्मिणीवरा।

आज शुद्ध अमावस्या घ्या गोड मानून शब्दसुमन।

बोला बाळूमामाच्या नावानंचांगभलं।

द्यावा आशिष।


कर्मयोगी मायप्पा माताभाऊक सुंदरा लक्ष्मीनारायण जोडा।

बाळाप्पानामे अंश देवत्वाचा उदरी सोमवार अश्विन शुद्ध द्वादशी शके१८१४

राज्ये कर्नाटक अक्कोळ ग्रामे बेळगावनजीक।

रूपमनोहर बाळाप्पाबाळूमामाअवतरला।

संध्यासमयी।


अतर्क्य अवधूतस्वरूप सर्वसिद्धी अवगत होती त्यास।

होता जरी निरक्षर भागवतगीता मुखोद्गत

अखंड नामस्मरण ओठी।

रामकृष्णहरी जप मूलमंत्र सश्रद्ध देऊन मनी रुजविला।

हरीचा।


दत्त नृसिंह सरस्वती गुरुमौनीमुळे सानिध्यात जीवन झोकले।

विधीलिखित जे घडले निमित्तमात्र

असे म्हणून भौतिक समस्या क्षणात निमविल्या।

आकलनीय वर्तन अनिष्ट रूढीपरंपरा कौशले सारभूत दूर केल्या।

शिस्तीत।


रमे शेतशिवारी निजे बाभळीकाट्यावर एकांतवास वाटे गोड

खाई कण्या आंबीलीचा घास।

ज्ञानधनाचे आगर होता धनगर शेळ्यामेंढ्यांची कदर राही आसपास।

मुक्या प्राण्यांचा तो बाप दीनदुबळ्यांसाठी अवतार भुवरी।

मामांचा।


वैकुंठाचा राणा वैकुंठासी गेला ।

सगुण रूप देहजागीच विसर्जिला

श्रावण वद्य चतुर्थी शके १८८८ निजधामी गेला।

केला भक्तांनी आक्रोश झाले अश्रू अनावर

पडला काळोख मेघ आले दाटून झाली अतिवृष्टी ।

वरूण।


धन्य मी या जन्मी काय केले पुण्यकर्म घडले समाधीदर्शन आदमापूरग्रामे।

भव्य समाधी मंदिर दक्षिणाभिमुख कोरीव महाद्वार।

परमपादुका समीप भव्य प्रसन्न मूर्ती बाळू मामांची।

निर्गुण।


तिन्ही तळांचा रक्षक रुद्र अवतार थोर जावे जन्मात एकदा।

आदमापुरी मामांच्या घ्यावा भंडारा प्रसाद।

एकादस अमावसेला भव्य सोहळा मामांचा

मनी इच्छा बोला जाईल फळास येईल प्रचिती घ्या अनुभूती ।

मामांची।


Rate this content
Log in