समाधानाचा शोध घे
समाधानाचा शोध घे
1 min
212
सोडून दे तुझा स्वार्थीपणा
धावू नको संपत्तीच्या मागे
दुसऱ्याला कधी फसवू नको
आंतरिक समाधानाचा शोध घे
इतरांचे ओढून घेण्यापेक्षा
त्यांना वाटण्यात आनंद आहे
दिल्याने कधी कमी होत नसते
तिथे मिळणारं समाधान आहे
कोणत्याही दुकानात दिसत नाही
ते सहजासहजी लाभत नाही
पैसे खर्च करूनही कळत नाही
समाधान असे फुकट मिळत नाही
