समाधान
समाधान
1 min
296
जीवनी आले
लाडो बनले
आई बाबांची
पणती झाले.......
शाळा शिकले
तिथे रमले
काॅलेज झाले
बी.ए. ही केले......
विवाह झाला
लग्नबेडीत
हो अडकले
या संसारात.....
सजणाची हो
प्रीतीची झाले
सासरची हो
लक्ष्मी बनले.....
सासर अन
हो माहेरची
काळजी केली
दोन्ही घरची....
समाधान हो
आता संसारी
कधीतरीच
जाते माहेरी....