STORYMIRROR

Vrushali Vajrinkar

Others

3  

Vrushali Vajrinkar

Others

सख्या

सख्या

1 min
388

नवरात्रीच्या नव रसात 

न्हाऊन निघाल्या या सख्या,

एकेका रंगांची उधळण करताना

रंगून गेल्या या सख्या...

तुमच्या माझ्यासारख्या सामान्य

या सख्या,

मग ..

असामान्य रंग कोणते असतात

 हे विचारूच नका तिला..

खूप काही केलंय तिने

तिच्या या स्त्री जीवनात

करडा ते लाल रंगाचे लेणे लेऊन

ती वावरली आहे या जगात....

ती जगलीय प्रत्येक रंगात 

तिला नका सांगू हो रंगांचे महात्म्य

क्षणाक्षणाला....

 रंग बदलणाऱ्या दुनियेला

शिकवले आहे तिने अध्यात्म...

कधी अलवार ,कधी काटेरी पदर

तिने अंगाभोवती घट्ट लपेटून घेतले आहेत...

ती नटली असेल कधी शृंगारात

तर ती होरपळली आहे 

तप्त अग्निरसात...

तिने मखमली शालू पांघरलाही असेल

तर ती भटकली आहे ,

लज्जावस्त्र नेसून वनावनात...

तिला ...

रंगांची महती सांगणारे तुम्ही कोण?

ती स्वयंभू नवरसात रंगूनच 

जन्माला आली आहे... एक 

स्त्री म्हणून, स्त्री म्हणून!


Rate this content
Log in