सख्या तुझ्या येण्याने
सख्या तुझ्या येण्याने
1 min
521
मनात माझ्या शिरकाव तुझा
झाला नयनांच्या रस्त्याने
माझे 'मी'पण हरवून बसले
सख्या तुझ्या येण्याने
नयनांत साठवले फक्त तुला
मोहले मला तुझ्या प्रेमाने
मनात असंख्य लहरी उठल्या
सख्या तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग बहरली
श्वास व्यापला सुगंधाने
अवघ्या जीवनाचे गोकुळ झाले
सख्या तुझ्या येण्याने
