सख्या प्रित झुला दे रे
सख्या प्रित झुला दे रे
1 min
188
तुझ्या भेटिला सख्या
मन शोधतय मोका
मती वेडावली माझी
चुके काळजाचा ठोका
मृग तू माझा प्रितीचा
मी कस्तुरी तुझ्यातली
प्रेम गंधात आपल्या
क्षणात मी सुखावली
नादत तुझ्या एकटी
प्रित वाट मी चालली
रम्य सार पदोपदी
चेतणी स्वप्न पडली
रंगला भाव प्रितीचा
झळकला चेह-यात
तुझ साठी प्रियकरा
प्रीत तुझी शृंगारत
नको दुरावा प्रितीत
घे मला तुझ्या मिठीत
सख्या प्रित झुला दे रे
झुलु दे तुझ्या प्रितीत
