सखी
सखी
आयुष्याच्या सुंदर प्रवासात भेट तिची माझी झाली
मैत्रीण म्हणून तिच्या सारखी गोड व्यक्ती मला लाभली
थोड्या दिवसांची ओळख
पण कधी परकी ना भासली
जणू बंध पूर्वीचेच अशी आपुलकी नेहमी वाटली
किती मन आल्हादले तिच्या माझ्या आयुष्यात येण्याने
दुःखावर फुंकर घातल्या जाई माझ्या, तिच्या सहवासाने
जुन्या आठवणी आजही चौफर साद घालतात
शाळा, कॉलेजचे ते दिवस मन रमून जातात आनंदाने
आज असलो जरी आम्ही आपल्याला व्याप्तात मग्न
अजूनही एकत्र आहे आपुलकीच्या बंधनाने
सहजतेने फुलले हे मैत्रीचे नाते
नाही दिसले तिथे
कधी कृत्रिमतेचे खाते
ते रुसवे-फुगवे अन् अगदी डोळ्यात पाणी
आणणारे ते क्षण
कोणी रागावले असता
बाजू घ्यायला तू,तूच केली पाठराखण
सुपाएवढे सुख मोजल तरी
मिळणार नाही अशी सखी, सोबतीण
भाग्यवान आहे मी म्हणूनच
लाभली मला अशी प्रेमळ, निर्मळ मैत्रीण ..
