STORYMIRROR

Sushama Gangulwar

Others

4  

Sushama Gangulwar

Others

सखी /मैत्रीण

सखी /मैत्रीण

1 min
782

सखी ही हक्काची 

एक नक्कीच अशी असावी

मी जरी रागावले 

तरी हळुच ती हसत दिसावी


नाही दिसली मी तिला 

तर क्षणभर हताश होणारी

सार काही मनातलं

धाड धाड बोलणारी


पण कुठेतरी मलाही 

माझी बाजु हळुच मांडु देणारी

हवी एक सखी अशी

माझ्यासाठी लढणारी


मला यत नसतील भावना 

माझ्या मांडता जरी

घ्यावा मनातील समजुन 

मुक्याशब्दांचा अर्थ ती 


असतील कितिही वळवाटा तरी 

सुख दुःखात क्षणिक वेळ देणारी

माझ्या यशाच्या प्रत्येक शिकरावर

आपूलकीचा थाप देणारी


चुकले मी कूठे जरी 

प्रेमाने समजुन सांगणारी

सखी ही हक्काची 

एक नक्कीच अशी असावी


Rate this content
Log in