सकाळची पहार.🏞️
सकाळची पहार.🏞️
1 min
138
झुंजूमुंजू पहाटे
हरवले मन माझे
उजाडल्या दिशा दाही
आनंदी मन होऊन जाई .
सूर्यनारायण वर आले
निसर्गाचेे सौंदर्य उजळले न्यारे.
प्राजक्ताच्या फुलांचा दारासमोर पसारा
मंद वारा त्याचा अलगद इशारा.
सुंदर रांगोळी प्रत्येकाच्या दारी
निसर्गाचेेेे हे रूप असते खूप भारी.
सकाळी उठता चालू होतेेे कामाची घाई
मुल उठत नाही म्हणून ओरडत असतेे आई.
सकाळच्या आरतीचा आवाज कानावर पडतो
धूपबत्ती चा वास दरवळलेला असतो.
बायकांच्या बांगड्यांचा खणखणाट
जसा संगीताचा ताल
पाखरांचाही मिसळे त्यात गोड किलबिलाट.
अशी हि शुभ्र सोनेरी सकाळ
शुभ्र सोनेरी सकाळ.
