सकाळचे स्वप्न
सकाळचे स्वप्न
1 min
143
सकाळी सकाळी सुगंध मोगर्याचा आला ,
स्पर्श तुझ्या आठवणीचा क्षण हळवा झाला...
काकणात गुंज त्या स्वरांची झंकारीते प्रिया,
मखमली बाहूवरून लडीवार प्रेमदवं घसरला ...
सकाळचे स्वप्न ते गोड आताही मज छेडते,
प्रेमाचा श्वास घेऊन तु गेला मजसवे भास उरला...
आठवांना स्वप्नात बघते बघून हसते ,
ज्या उरल्या प्रेमकळ्या सुगंध त्यांचाच श्वासात भरला...
नाही अट तू ये परतूनी मजपाशी कधी,
अर्ध्यावरतीच कसारे जीवनाचा हात सुटला...
