सिंह गर्जना
सिंह गर्जना
1 min
264
जलमंदिर त्या मेघ डंब्रीत
विणले कोणी नक्षी कलाबुत
होते सिंहासन हिरे जडित
राजा विसावला त्या कपारीत
सिंहाच्या त्या मेघ गर्जना
अलगद फुटला आघोर पान्हा
कुरवाळली धुंद आयाळ त्याने
स्थापित केला आपला बाणा
नक्षत्राच्या डोंगर रांगा
हिरवट टच बहरली अंगा
कोंदनातून फुटला पाझर
स्त्रवल्या त्या पाताल गंगा
