सिंधूताई सकपाळ
सिंधूताई सकपाळ
1 min
126
गेली अनाथांची माय,
पडली लेकरं उन्हात,
आयुष्याच दु:ख,
गेली मनात घेऊन,
लेकरांच्या हितासाठी,
अख्ख आयुष्य झिजली,
माय सिंधूताईची आज,
प्राणज्योत ही विजली......
काटे तुडवत चाले,
पाय तरी ना थकले,
आले संकट अपार,,
नाही सत्कार्य रुकले.
माय जगात हिंडली
नाही पदर पडला,
माय झाली भारताची,
नवा इतिहास घडला......