सिंधुताई सपकाळ
सिंधुताई सपकाळ
1 min
330
हजारो अनाथ लेकरांची
माय झाली।
गोठ्यात हंबरणाऱ्या वासरांची
गाय झाली।
अर्धीतली चतकोर स्वतः खाऊन
भिकाऱ्यांची वाली झाली।
सुंदर भजन गाऊन तू
भजनातली माऊली झाली।
जीवनाशी संघर्ष करत
माई तू इथवर आलीस
जीवन काय असत आमच्या
आयुष्याला सांगून गेलीस।
भूक लागली होती तेंव्हा खाली स्मशानातली अर्धी भाकरी
सुंदर गाणे म्हणून रेल्वेत मिळवली
पोटापूर्ती चाकरी।
मरावे परी किर्तीरूपे उरावे
ही म्हण आम्हाला सगळ्यांना शिकवून गेली।
अशा माऊलीला त्रिवार वंदन
