STORYMIRROR

Prof. Shalini Sahare

Others

4  

Prof. Shalini Sahare

Others

सिंधुताई सपकाळ

सिंधुताई सपकाळ

1 min
634

अनाथांची माय अशी का दूर गेली

आम्हा सगळ्यांना पोरकं करून गेले

काळालाही का आमची दया नाही आली

माय तुझे उपकार किती आभाळही गहिवरले


उघड्यावर टाकण्यापरीस लेकरं

तिच्याकडे बघून आया होत्या सुखावल्या

इवल्याशा जिवात जीव आल्या, नि 

त्याही सिंधुताईच्या पदरात विसावल्या


स्वतःची बाळे सांभाळणे झाली आहे कठीण

ही माय माऊली लेकरांना देते पदर

हासले, वाढले कुशीत तिच्या

साऱ्या जगाला तिची कदर


सोपं नसतं असं अनाथांची माय होणार

सुना नातवंड लेकी असा संसार बहरण

होतील खूप समाजसेविका अन दानविर

पण तूच कलियुगातील करण 


माय तुझ्यासारखी आता होणे नाही

माय तू होतीस म्हणून किती होता आधार

आभाळ फाटलय डोक्यावरचं, ठिगळ कसं लावणार

सांग आता कुठे, कसा, शोधू कुठे आधार


Rate this content
Log in