सीतेचे अग्नीदिव्य
सीतेचे अग्नीदिव्य
1 min
213
सीतेचे अग्नीदिव्य
युगानुयुगे चालूच आहे
अग्नीचं माध्यम बदललं
कधी अॅसिड तर कधी पेट्रोल
नाहीच काही सापडलं
तर आहे बलात्कारच माथी
प्रेम करणारा राम, कृष्ण बनून
घुटमळत राहिल तुमच्या भोवती
बाका प्रसंग आला
तर नसे राम, कृष्ण सोडवाया भोवती
कलीयुगातली सीता
आजही एकटीच अग्नीदिव्याला सामोरी जाया
