STORYMIRROR

Pandit Warade

Others

4  

Pandit Warade

Others

सीमोल्लंघन

सीमोल्लंघन

1 min
323

साडेतीन मुहूर्तापैकी एक

मुहूर्त विजया दशमीचा

स्वत:तल्या दुष्ट प्रवृत्तीवर

प्रेमाने विजय मिळवण्याचा... १

नवरात्री देवीची उपासना

मनोभावे शक्तीचे पूजन

रास गरबा खेळू आनंदे

देवीला केंद्रस्थानी ठेवून...... २

शमी वृक्षावर याच दिवशी

पांडवांनी दिव्यास्त्रे लपवली

रघुचा पराक्रम पाहून कुबेराने

शमीवर सुवर्ण मुद्रांची बरसात केली ..३

जगदंबेचा महिषासुरावर विजय

विजयादशमी सम्राट अशोकाची

डॉ. आंबेडकरांनी याच दिवशी

दीक्षा घेतली बौद्ध धर्माची ...४

याच दिवशी पराक्रमी राजे

आक्रमणासाठी निघायचे

शत्रूच्या राज्यातील सोने

जनतेसाठी लुटायचे ......५

कळत नकळत दसऱ्याच्या

मागील सत्य भाव लोपला

खोट्या परंपरा घुसल्या

दसरा साजरा होऊ लागला ..६

सारे मिळून बदलून टाकू 

कालबाह्य त्या परंपरा

हेच खरे सीमोल्लंघन

हाच खराखुरा दसरा ...७


Rate this content
Log in