STORYMIRROR

शशिकांत राऊत

Others

3  

शशिकांत राऊत

Others

* सीमोल्लंघन *

* सीमोल्लंघन *

1 min
366

ध्येय साकार करण्या, आन घेऊनी निघती,

सीमोल्लंघन करुनी, जगी मिळविती किर्ती।।


पूर्वी क्षत्रिय भूपती, जाती लढण्या लढाई,

सीमोल्लंघन करुनी, येती जिंकून चढाई।।


लग्न होऊनी मुलगी, धरी सासरची वाट,

सीमोल्लंघन करुनी, सांगे सासरचा थाट।।


मुलं नोकरी निमित्त, दूर परदेशी जाती,

सीमोल्लंघन करुनी, स्वप्न सुखाची पाहती।।


नका पाहू बाहेरचे, बघा शत्रू अंतर्मनी,

सीमोल्लंघन करुनी, मारा विकार शोधूनी।।


पराभव असत्याचा, विजय सत्याच्या हाती,

सीमोल्लंघन करुनी, सूत्र संतचि सांगती।।


Rate this content
Log in