STORYMIRROR

Sarika Jinturkar

Others

3  

Sarika Jinturkar

Others

सिद्ध कर स्वतःला

सिद्ध कर स्वतःला

1 min
144

नको आणू डोळ्यात पाणी  

तू तर आहे झाशीची राणी 

तूच आहे रणरागिनी  

जागव तुझ्यातली जिजाई

 तूच आई, माता, भगिनी  


पुरातन काळी तर आगीत होरपळून गेली 

स्त्री जन्म घेतला अन् होळी जीवनाची केली  


अग्नि परीक्षेलाही तू सामोरी गेली

 अहिल्या, सीता, द्रौपदी ही झाली  

तरीही का अजुनही अवेहलनास पात्र..?


सिद्ध कर स्वतःला

 अन्याय होत असेल

 अन्यायाविरुद्ध लढ  

तूच तुझी ग खरी ओळख  


यशाची घे उंच भरारी 

स्वतःमधल्या स्वताला कधीतरी जिंकून बघ 


सर्वांची मत कायम एकसारखी असतील कशी?

 नकारार्थी,सरकारार्थी प्रत्येकाची वेगळी राशी

म्हणून थोडं स्वतःसाठी जग

 कधी यशाची चव चाख तर 

कधी अपयश निरखून तू बघ  

 सिद्ध कर स्वतःला  

परिस्थितीशी समरस 

होऊन तू निर्भीडपणे जग..


Rate this content
Log in