शुभेच्छा नकॊ आदर द्या
शुभेच्छा नकॊ आदर द्या
जागतिक महिला दिन उगवला
आज चा सूर्य जणू आमच्या साठीच
भरला मोबाईल सगळ्यांच्या शुभेच्छानी अनेक प्रश्न पडतात मनी
हे दिवसांचे खूळ काढलेय कोणी ? कर्तव्यापोटी रात्रंदिवस लढते
विचार करा कोणासाठी काय काय करते लहानपणीची बाहुली घरभर खेळते
जरा कुठे बहरायला लागली
कि बंधनात अडकते
जन्माचे घर सोडून परक्या घराला
माणसांना आपलंस करते
सगळ्यांची काळजी घेणे
जबाबदारी समजते
सासूसासऱ्यांची लाडकी सून बनते
दीर नंदांची वाहिनी होते
नवऱ्यासाठी सतीचे वाण घेते
मुलांसाठी जिजाऊ होते
बहीण भावाची ताई आई होते
दिवसरात्र रोजच तर कर्तव्य पार पडते
मग ह्या एका दिवसात तुम्ही
या स्त्री शक्ती ला कसे साजरे करता
फक्त जाणीव ठेवा तिच्या स्त्रीत्वाची
रोजचा दिवस करा स्त्री शक्तीच्या
आदराने साजरा तरच
तिला मिळतील खऱ्या शुभेच्छा
