शुभ सकाळ
शुभ सकाळ
सकाळपासून सुरुवात होते
ती आपल्या जीवनाची।
सूर्याच्या किरणांची आणि
सुंदर दिवसाची।
सकाळ तू रोज येशील तेंव्हा
सगळ्यासाठी आनंद घेऊन ये।
दुःखात असणाऱ्यासाठी सुख घेऊन ये।
रडणाऱ्या डोळ्यांसाठी आनंदाश्रू घेऊन ये।
उपाशी राहणाऱ्यासाठी पोटभर अन्न घेऊन ये।
प्रत्येकाला दुखाशी लढण्यासाठी बळ दे।
सुख दुःखाचे घास दे पण पचवायची युक्ती दे।
तू देखील रोज आमच्या सगळ्यासाठी चांगलं काही घेऊन
येऊ शकते याची आम्हा प्रचिती दे।
याची आम्हा प्रचती दे।
आपल्या सर्वाना सुंदर दिवसाच्या शुभ सकाळच्या खूप खूप शुभेच्छा
